पंजाबी गायिका आणि बिग बॉस फेम अभिनेत्री शहनाज गिलने आपले ग्लॅमरस फोटो शेअर करत सर्वांनाच चकित केलं आहे. शहनाज गिलने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. शहनाज गिलचे हे ग्लॅमरस फोटो प्रसिद्ध सेलेब्रिटी फोटोग्राफर डब्बू रत्नांनी यांनी क्लिक केले आहेत. वेस्टर्न ड्रेसमध्ये शहनाज गिल फारच बोल्ड अँड ब्युटीफुल दिसत आहे. शहनाजने यामध्ये ब्लॅक अँड ग्रीन ड्रेस परिधान केला आहे. फोटोंमध्ये शहनाज गिलने न्यूड मेकअप केला आहे. सोबतच केसांचा बन बांधला आहे. शहनाज गिलने हे फोटो शेअर करताच चाहते तिच्यावर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव करत आहेत. अभिनेता आणि बॉयफ्रेंड सिद्धार्थ शुक्लाच्या आकस्मिक निधनाने शहनाजला मोठा धक्का बसला होता.त्यांनतर ती तब्बल 2 महिने सोशल मीडियापासून दूर होती. आता ती हळूहळू सर्वसामान्य आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे. ती पुहा एकदा सोशल मीडियावर सक्रिय झाली आहे.