वयाच्या अवघ्या 40 व्या वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला. मुंबईतील कूपर रुग्णालयात (cooper hospital) त्याला मृत घोषित करण्यात आलं होतं. बिग बॉसमधून प्रसिद्ध झालेली जोडी शेहनाझ गिल (Shenaaz Gill) आणि सिद्धार्थ शुक्ला चाहत्यांचे फारच आवडते होते. शेहनाझ ही सिद्धार्थची अगदी जवळची मैत्रीण होती. तर त्याची कथित प्रेयसी असल्याचं म्हटलं जातं.
अभिनेता सिद्धार्थ शुक्लाचा मृत्यू (Sidharth Shukla) ही घटना अजूनही अनेकांसाठी विश्वास न ठेवण्यासारखी आहे. या घटनेनंतर त्याच्या चाहत्यांमध्ये दु:खाचं वातावरण आहे. वयाच्या अवघ्या 40 वर्षी सिद्धार्थने जगाचा निरोप घेतला, त्याने अशावेळी जगाला अलविदा केलं जेव्हा त्याने 'नेम आणि फेम' दोन्ही मिळण्यास सुरुवात झाली होती