चित्रपट निर्माता करण जोहरने (Karan Johar) 26 मे रोजी त्याचा 50 वा वाढदिवस साजरा केला, ज्यात अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. करण जोहरच्या बर्थडे पार्टीला ऐश्वर्या राय बच्चन (Aishwarya Rai Bachchan), माधुरी दीक्षित नेने, रणबीर कपूर, रणवीर सिंग यांच्यासह बी-टाउनचे सर्व मोठे स्टार्स पोहोचले होते. संजय कपूरची मुलगी शनाया कपूरनेही करण जोहरच्या वाढदिवसाच्या पार्टीला हजेरी लावली, जिथे तिची धमाकेदार स्टाईल पाहायला मिळाली. शनायाने तिचे अनेक फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत, ज्यामध्ये तिची जबरदस्त स्टाइल पाहायला मिळत आहे. (फोटो क्रेडिट्स: Instagram: @shanayakapoor02)