अभिनेता संजय कपूरची मुलगी शनाया कपूर आणि शाहरुख खानची मुलगी सुहाना खान यांचे फोटो समोर आलेत. शनाया कपूर आणि सुहाना खान या दोघी दुबईत केंडल जेनरच्या पार्टीला गेल्या होत्या. शनाया कपूर लाल रंगाच्या नेकलाइनसह ड्रॉप-डेड ड्रेसमध्ये दिसली. शनायानं तिचे बेडवरील हॉट फोटो शेअर केलेत. तर सुहानानं देखील डिप नेक शॉर्ट वनपिस घातला होता. दोघींनी फुटवेअर ट्विन केले होते. शनायानं पार्टीला घातलेला आऊटफिट हा सुहानाच्या आऊटफिटपेक्षा महागडा होता. शनायानं घातलेल्या ऑफ शोल्डर बॉडी कॉन ड्रेसची किंमत 50, 999 रुपये इतकी आहे. तर सुहानानं घातलेल्या डिप नेक ड्रेसची किंमत 1,862.45 रुपये असल्याची माहिती मिळत आहे.