शाहरुख खानचा पठाण हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करतोय. तर दुसरीकडे शाहरुखचा जवान हा सिनेमा लवकरच येणार आहे.
2/ 9
शाहरुखच्या जवान सिनेमाचा डायरेक्टर एटली कुमार यानं सिनेमा रिलीज होण्याआधी आनंदाची बातमी दिली आहे.
3/ 9
दिग्दर्शक एटली लग्नाच्या आठ वर्षांनी अखेर बाप झाला आहे. पत्नी प्रियानं गोंडस मुलाला जन्म दिलाय.
4/ 9
एटलीनं बायकोबरोबरचा फोटो शेअर करत ही गुड न्यूज सर्वांना दिली.
5/ 9
काही दिवसांआधीच दोघांनी बेबी शॉवरचे फोटो शेअर करत घरी येणाऱ्या नव्या पाहुण्याची बातमी दिली होती.
6/ 9
'आमचं बाळ आलं आहे. पालक होण्याचा नवा आणि रोमांचक प्रवास आजपासून सुरू झालाय. हा आनंद आम्हाला दुसरं कोणीही देऊ शकत नाही. खूप आनंदी आहोत आणि धन्य वाटत आहे', अशी पोस्ट एटलीनं लिहिली आहे.
7/ 9
एटली हा तमिळ फिल्म इंडस्ट्रीचा प्रसिद्ध दिग्दर्शक आहे. आतापर्यंत त्याने अनेक हिट फिल्म्स दिल्या आहेत.
8/ 9
त्याचा आगामी जवान हा सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षक उत्साही आहेत.
9/ 9
जवानमध्ये शाहरुखबरोबर अभिनेता विजय सेतुपती प्रमुख भूमिकेत आहे.