

शाहरुख खानची (Shah Rukh Khan) मुलगी सुहाना खान कायमच सोशल मीडियावर (Social Media) अॅक्टिव्ह असते. सुहानाने नुकतेच तिच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही स्टायलिश फोटो शेअर केले आहेत. (Photo Credit- @suhanakhan2/Instagram)


या फोटोत सुहाना हायनेक टॉप आणि डार्क ब्राऊन ट्राऊजरमध्ये खूप स्टायलिश (Stylish) दिसत आहे, तिच्या हातात एक गोल्डन व्हाईट रंगाचा कप आहे. (Photo Credit- @suhanakhan2/Instagram)


या फोटोत सुहाना कुठेतरी बाहेर फिरताना दिसत आहे. तिच्या कपड्यांप्रमाणेच हटके शूज, ब्लॅक कोट आणि स्टायलिश ब्राऊन पर्स चर्चेचा विषय ठरत आहेत. (Photo Credit- @suhanakhan2/Instagram)


सुहानाचे हे फोटो सोशल मीडियावर जोरदार धुमाकूळ घालत आहे. या फोटोवर सुहानाला अगदी काही तासातच जवळजवळ 3 लाख लाईक्स मिळाले आहेत. सुहाना तिच्या आयुष्यातील प्रत्येक अपडेट तिच्या सोशल मीडिया पेजवरून देताना दिसते. सुहानाचे इंस्टाग्रामवर (Instagram) 14 लाख फॉलोअर्स (Followers) आहेत. (Photo Credit- @suhanakhan2/Instagram)


शाहरुखला सुहानाच्या डेब्यूबद्दल विचारले असता तो म्हणाला बॉलिवूडमध्ये पदार्पण करायचं की नाही आणि करायचं तर कधी करायचं हा निर्णय सुहानाचा असणार आहे. सुहानाचं शिक्षण संपल्यावर ती काय तो योग्य निर्णय घेईल. बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्यापूर्वीच सुहानाचे लाखो चाहते आहेत. (Photo Credit- @suhanakhan2/Instagram)