2 वर्षाच्या ब्रेकनंतर शाहरुखचा जबरदस्त कमबॅक; रोलसाठी बदलला लूक ! पाहा PHOTO
शाहरुख खान (Shah Rukh Khan) 2 वर्षाच्या मोठ्या ब्रेकनंतर आता चांगलाच फॉर्ममध्ये आला आहे. त्याने तब्बल 3 फिल्म्स साईन केल्या आहेत. विशेष म्हणजे शाहरुख त्यातल्या एका सिनेमामध्ये डबल रोल करणार आहे.


बॉलिवूडचा बादशहा शाहरुख खान (Shahrukh khan) सध्या आपल्या लूकमुळे चांगलाच चर्चेत आला आहे. शाहरुखच्या याआधीचा सिनेमा, झीरो (Zero) बॉक्स ऑफिसवर आपटला. त्यानंतर शाहरुखने 2 वर्षाचा ब्रेक घेतला होता. आता किंग खान पुन्हा एकदा लाईट्स, कॅमेरा, अॅक्शन फेस करणार आहे. फोटो साभार- @iamsrk/Instagram


किंग खान 2 वर्षाच्या ब्रेकनंतर चांगलाच फॉर्ममध्ये आला आहे. त्याने एक नाही 2 नाही तब्बल 3 फिल्म साईन केल्या आहेत. शाहरुख लवकरच पठाण फिल्मच्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. त्या नंतर हा अभिनेता राजकुमार हिरानी आणि एका दाक्षिणात्य फिल्ममेकरच्या सिनेमाचाही ऑफर आहे.


शाहरुखच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे ती म्हणजे, त्याच्या नव्या सिनेमामध्ये तो डबल रोल करणार आहे.


शाहरुख खान पहिल्यांदाच साऊथ इंडियन दिग्दर्शक एलटी यांच्यासोबत काम करणार आहे. या सिनेमामध्ये शाहरुखचा डबल रोल असेल. या आधी त्याने ड्युप्लीकेट आणि डॉन या सिनेमांमध्ये डबल रोल साकारला होता.यामध्ये शाहरुख मुलगा आणि वडीलांची भूमिका साकारणार आहे.’ 2 पिढ्यांमधील अंतर’ हा विषय या सिनेमामध्ये हाताळला जाणार आहे.


या सिनेमामध्ये शाहरुख एका सीनिअर रॉ एजंटच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. या फिल्ममध्ये मेकअपवर बराच भर देण्यात आला आहे. शाहरुखच्या लूकवर या सिनेमात खूप मेहनत घेण्यात येत आहे.


पठाण सिनेमामध्ये शाहरुख खानसोबत जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण यांच्याही भूमिका आहेत. नोव्हेंबर महिन्यात पठाण सिनेमाच्या शूटिंगला सुरुवात होईल. पहिल्या शेड्यूलमध्ये शाहरुखचं शूटिंग होणार आहे. तर जानेवारीमध्ये पठाण सिनेमाचं दुसरं शेड्यूल सुरू होणार आहे. त्यात जॉन अब्राहम आणि दीपिका पादुकोण यांचं शूटिंग होणार आहे. मुंबईच्या यशराज फिल्म्स स्टुडिओमध्ये शाहरुख शूट करणार आहे.