10 वर्षानंतर असा दिसतो शाहरुख आणि काजोलचा ऑनस्क्रीन मुलगा, बघा PHOTO
'माय नेम इज खान' चित्रपटात शाहरुख आणि काजोलच्या मुलाची भूमिका केलेला अर्जन औजला हा बालकलाकार 10 वर्षांनी ओळखणंही कठीण आहे.
|
1/ 10
बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खानचा लोकप्रिय सिनेमा ‘माय नेम इज खान’ला 10 वर्ष पूर्ण झाली आहेत. 12 फेब्रुवारी 2012 ला शाहरुखचा सिनेमा रिलीज झाला होता. आजही हा चित्रपटाला प्रेक्षकांची तितकीच पसंती मिळते आहे.
2/ 10
या सिनेमातील शाहरुख आणि काजोलचा मुलगा आठवतोय का? शाहरुख आणि काजोलचा ऑनस्क्रिन मुलगा अर्जन औजला आता मोठा झाला आहे. 10 वर्षानंतर अर्जनला ओळखणं कठीण आहे.
3/ 10
‘माय नेम इज खान’ चित्रपटात शाहरुख आणि काजलचं लग्न झालेलं दाखवलं होतं. यामध्ये अर्जन औजला या दोघांच्या मुलाच्या भूमिकेत दाखवला होता. 10 वर्षांपूर्वी दाखवलेला हा बालकलाकार आता हँडसम बॉय झाला आहे.
4/ 10
शाहरुखच्या चित्रपटातील हा कलाकार आता पुन्हा बॉलिवूडमध्ये डेब्यू करण्यासाठी कसून मेहनत करतोय. अर्जनने नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत त्याच्या या चित्रपटातील आठवणींना उजाळा दिला आहे. माय नेम इज खान चित्रपटाला 10 वर्ष झाली यावर विश्वास बसत नसल्याचं अर्जन या मुलाखतीत म्हणाला आहे.
5/ 10
‘माय नेम इज खान’ हा चित्रपट आपल्यासाठी आयुष्य बदलून टाकणारा अनुभव होता, असंही अर्जनने या मुलाखतीत सांगितलं आहे.
6/ 10
शूटिंगदरम्यान शाहरुखसोबत आलेले अनुभवही त्याने शेअर केले आहेत. अर्जनने सांगितलं की, गोरेगावमध्ये चित्रपटाच्या शूटिंगच्या पहिल्याच दिवशी शाहरुख त्याच्याजवळ आला आणि शाहरुखने त्याला त्याचं नाव विचारलं.
7/ 10
शाहरुखने घाबरु नकोस असंही सांगितलं होतं. आपण दोघं मिळून सगळं करू असा विश्वासही शाहरुखने दिल्याचं अर्जनने सांगितलं आहे.
8/ 10
अर्जनने पुढे असंही सांगितलं की, काजल त्याच्यासोबत त्याच्या अभ्यासाबाबत चर्चा करत असे. तर दिग्दर्शक करण जोहर त्याची विशेष काळजी घेत असे.
9/ 10
अर्जनने सांगितलं की, त्यावेळी या चित्रपटात अभिनेता वरुण धवन आणि सिद्धार्थ म्हलोत्रा असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करत होते.
10/ 10
अर्जनने नुकतचं अभिनेता वरुण धवनसोबत एका जाहीरातीत काम केलं आहे. त्यावेळी त्याने आपली ओळख सांगितल्यानंतर वरुणलाही आपण इतके मोठे झालो आहोत यावर विश्वास बसला नव्हता असं अर्जनने सांगितलं.