

छोट्या पडद्यावरील अत्यंत बोल्ड आणि स्टायलिस्ट अभिनेत्री म्हणजे निया शर्मा. नियाने गोव्याच्या समुद्रकिनारी बिकिनी फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो सध्या चांगलेच व्हायरल होत आहेत.


निया शर्माच्या फोटोंना 4 लाखांपेक्षा जास्त लाईक्स मिळाले आहेत. निया सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.


काही दिवसांपूर्वी निया तिच्या बर्थडे केकमुळे चर्चेत आली होती. नेटकऱ्यांनी तिला बरंच ट्रोल केलं होतं.


काली या मालिकेमधून नियाने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. त्यानंतर तिने अनेक मालिकांमध्ये काम केलं.


निया शर्माने ‘एक हजारों मे मेरी बना हैं’ या मालिकेतून प्रेक्षकांच्या मनात विशेष स्थान मिळवलं. त्यानंतर ‘जमाई राजा’ या मालिकेत मुख्य भूमिका तिच्या वाट्याला आली.


विक्रम भट्ट यांच्या ट्विस्टेड या वेब सीरिजमध्येही तिने काम केलं आहे. ही वेब सीरिज हीट झाली होती.


रवी दुबे आणि निया शर्माचा हा फोटो फारच व्हायरल होत आहे. या फोटोंवर इंडस्ट्रीमधील काही कलाकारांनीही कॉमेंट्स केल्या आहेत.