हिरोईनपेक्षा कमी नाहीत 'या' साऊथ स्टार्सच्या पत्नी; लामलाटपासून राहतात दूर
साऊथचे असे अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत, ज्यांच्या पत्नीसुद्धा एखाद्या हिरोईनसारख्याच आहेत. मात्र त्या नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहतात.
|
1/ 11
साऊथचे असे अनेक प्रसिद्ध कलाकार आहेत, ज्यांच्या पत्नीसुद्धा एखाद्या हिरोईनसारख्याच आहेत. मात्र त्या नेहमीच लाइमलाइटपासून दूर राहतात.
2/ 11
प्रसिद्ध साउथ अभिनेता आणि चिरंजीवीचा मुलगा रामचरनची मुलगीसुद्धा खूपच सुंदर आहे. त्याच्या पत्नीचं नाव उपासना असं आहे. ती अपोलो रुग्णालयाच्या एक्झीक्यूटीव्ह चेयरमनची नात आहे.
3/ 11
अभिनेता अल्लू अर्जुनने स्नेहा रेड्डीसोबत लग्न केलं आहे. या दोघांची भेट एका लग्नामध्ये झाली होती. त्यावेळी त्यांनी एकमेकांचे फोन नंबर घेतले होते. त्यावेळी स्नेहा नुकताच आपलं शिक्षण पूर्ण करून अमेरिकेतून परत आली होती.
4/ 11
अभिनेता नागार्जुनने अमलासोबत दुसरं लग्न केलं होतं. त्यांना दोन मुले आहेत.
5/ 11
अभिनेता रवि तेजाची पत्नीसुद्धा खुपचं सुंदर आहे. त्याने 2002मध्ये कल्याणीसोबत लग्न केलं होतं. आज त्यांना मोक्षदा ही मुलगी आणि मानीत हा मुलगा आहे.
6/ 11
प्रसिद्ध अभिनेता ज्युनियर NTRने 2011मध्ये लक्ष्मी प्रणतीसोबत लग्न केलं होतं. साखरपुड्यानंतर लक्ष्मी 18 वर्षांची होईपर्यंत लग्नासाठी थांबावं लागलं होतं.
7/ 11
अभिनेता सूर्याने आपली सहअभिनेत्री ज्योतिकासोबत लग्न केलं आहे. या दोघांना एक मुलगा आणि एक मुलगी आहे.
8/ 11
अभिनेता आर. माधवनने 1999मध्ये सरिता बिरजेसोबत लग्न केलं होतं. या दोघांना वेदांत नावाचा एक मुलगा आहे.
9/ 11
अभिनेता महेशबाबूने बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शिरोडकरची बहीण आणि अभिनेत्री नम्रता शिरोडकरसोबत लग्न केलं होतं.
10/ 11
अभिनेता धनुषने सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्यासोबत लग्न केलं आहे.
11/ 11
अभिनेता अजित कुमारने आपली सहअभिनेत्री शालिनीसोबत लग्न केलं आहे.