नायक नायिका नाही तर 'हे' आजी आजोबा गाजवतायत छोटा पडदा; मराठी मालिकेतील सर्वाधिक लोकप्रिय चेहरे
मालिका विश्वात सध्या अनेक प्रयोग सुरू आहेत. अनेक नव नवीन कलाकार छोट्या पडद्यावर प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. परंतु अनेक मालिकांमध्ये नायक नायिका नव्हे तर मालिकेत काम करणारे ज्येष्ठ कलाकारच सर्वाधिक लक्ष वेधून घेत आहेत. त्यांच्या अभिनयाची जादू प्रेक्षकांना भुरळ घालत आहेत. प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे कोण आहेत ते ज्येष्ठ कलाकार जाणून घ्या.
|
1/ 11
स्टार प्रवाहवर सुरू असलेल्या 'अबोली' मालिकेतील आजी सर्वांच्या पसंतीस उतरली आहे. आजीची अस्सल मालवणी ऐकण्यासाठी प्रेक्षक आवर्जुन मालिका पाहतात.
2/ 11
अव्हरग्रीन अभिनेते अशोक शिंदे 'स्वाभिमान' मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर आले आहेत.
3/ 11
अभिनेत्री किशोरी अंबिये 'सह कुटुंब सहपरिवार' या मालिकेतून मामीचं पात्र उत्तमरित्या वठवत आहे.
4/ 11
ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांचा डॅशिंग अंदाज 'तू तेव्हा तशी' या मालिकेतून प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे.
5/ 11
तर ज्येष्ठ अभिनेत्री उज्जवा जोग यांनी ही 'तु तेव्हा तशी' मालिकेत साकारलेली 'माई मावशी' सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे.
6/ 11
सगळ्यांचे लाडके अभिनेते अरुण नलावडे यांचा प्रेमळ अंदाज 'मन उडू उडू झालं' मालिकेतून पाहायला मिळतोय.
7/ 11
90चा काळ गाजवणाऱ्या आणि आजही तरुण असलेल्या अभिनेत्री वर्षा उसगावकर 'सुख म्हणजे नक्की काय असतं' मालिकेत नंदिनी शिर्के पाटील साकारत आहेत. त्यांच्या सौंदर्याची जादू आजही तशीच कायम आहे.
8/ 11
अनेक मराठी सिनेमातून महत्त्वाची भूमिका साकारणारे फिट अँड फाइन हँडसम अभिनेते मिलिंद गवळी 'आई कुठे काय करते' मालिकेत साकारत असलेली अनिरुद्ध ही भूमिका आज महाराष्ट्राच्या घराघरात पोहोचली आहे.
9/ 11
80 आणि 90 च्या काळातील सोज्वळ आणि सुंदर अभिनेत्री निवेदिता सराफ यांनी 'भाग्य दिले तु मला' मालिकेतून पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एंट्री घेतली आहे. या आधी त्यांनी 'अग्गंबाई सासूबाई' आणि 'अग्गंबाई सूनबाई' मालिकेतही दमदार भूमिका साकारली होती.
10/ 11
आई कुठे काय करते मालिकेतील आई आणि आप्पा तर सर्वांचे लाडके आहेत. दोघांनी साकारलेली गोड आजी आजोबांची भूमिका सर्वांच्यात पसंतीस उतरली आहे.
11/ 11
आणि ज्यांच्या शिवाय देवमाणूस ही झी मराठीवरील मालिका पूर्णच होऊ शकत नाहीत ती म्हणजे सरू आजी. सरू आजींचा दरारा आणि त्यांच्या म्हणींनी त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची मनं जिंकली आहेत.