

गेल्या वर्षी देसी गर्ल प्रियांका चोप्रा आणि निक जोनस विवाह बंधनात अडकले. दोघांनी हिंदू आणि ख्रिश्चन या दोन्ही पद्धतीने दणक्यात लग्न केलं. लग्नामध्ये मेहंदी, संगीत, दमदार पार्टी आणि रिसेप्शन असे एक ना दोन अनेक कार्यक्रमांचा समावेश लग्नात होता. मात्र काही दिवंसापूर्वीच निकने सर्वांना बुचकळ्यात टाकणारं वक्तव्य केलं.


निक म्हणाला की, लग्न करताना अचानक एक असा प्रसंग समोर आला की ज्यामुळे आम्ही लग्न थांबवण्याचा निर्णय घेणार होतो. 'द लेट शो विथ जेम्स कॉर्डन' या रिअलिटी शोमध्ये नीकने त्याच्या लग्नाचा हा भन्नाट किस्सा सांगितला.


त्याचे झाले असे की, 'लग्नातील भरमसाठ कार्यक्रम करताना तुम्हाला असं कधी वाटलं नाही का आता हे लग्न थांबवायला हवं?' असा विचित्र प्रश्न विचारण्यात आला. याचं उत्तर देताना निक सुरुवातीला हसला आणि नंतर म्हणाला, 'होय... जेव्हा मी लग्नाचं वाढतं बिल पाहीलं तेव्हा मला खरोखर वाटलं होतं की आता हे थांबवायला हवं.'


निकचं हे मजेदार उत्तर ऐकल्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. याआधी जोनसच्या भावाने सांगितलं होतं की, प्रियांकाच्या सासरी एक अशीही व्यक्ती आहे जिला प्रियांका अजिबात आवडायची नाही. एका कार्यक्रमात निकचा भाऊ केविनने सांगितलं की, त्याची छोटी मुलगी वेलेंटिनाला प्रियांका फारशी आवडत नव्हती. तिला प्रियांकासोबत रमायला थोडा वेळ लागला.


आता माझी मुलगी प्रियांकासोबत रुळायला लागली आहे, पण सुरुवातीला वेलेंटिनाला प्रियांकासोबत रमायला थोडा वेळ लागला होता. काका पुतणीचं एक वेगळंच नातं आहे. त्यामुळे आधी प्रियांका जेव्हा निकला भेटायची तेव्हा वेलेंटिनाला ते अजिबात आवडायचं नाही.