Sayali Sanjeev : 'कोणालाही कळू न देता मी...'; गोष्ट एका पैठणीसाठी केलेल्या 'त्या' कामाचा अखेर सायलीनं केला खुलासा
राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या गोष्ट एका पैठणीची या सिनेमात अभिनेत्री सायली संजीव प्रमुख भूमिकेत आहे. सायलीनं सिनेमासाठी कोणाच्याही नकळत एक महत्त्वाचं काम केलं होतं. मात्र त्याचा खुलासा तिनं आता केला आहे.
गोष्ट एका पैठणीची हा सिनेमा येत्या 2 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. सिनेमात अभिनेत्री सायली संजीव प्रमुख भूमिकेत आहे.
2/ 8
सिनेमात सायली शिवणकाम करणारी साधी गृहिणी आहे. जी आजूबाजूच्या बायकांच्या साड्यांना फॉल बिडिंग करून देते, ब्लाऊज शिवून देते.
3/ 8
अभिनयाच्या जोरावर ही भूमिका नक्कीच साकारता आली असती. परंतू भूमिकेत नैसर्गिकता आणण्यासाठी सायलीनं खास मेहनत घेतली आहे. सिनेमाविषयी बोलतानं एक सिक्रेट सांगितलं.
4/ 8
सायलीनं म्हटलंय, 'भूमिकेत नैसर्गिकता आणण्यासाठी, त्या भूमिकेशी एकरूप होण्यासाठी मी दोन दिवसांचा शिवण क्लास लावला'.
5/ 8
'गोष्ट एका पैठणीची’मध्ये मी अतिशय जुन्या काळातील मशीनवर काम करतेय. त्यामुळे मला शिलाई मशीन हाताळणे, सुईमध्ये दोरा भरणे, तेल टाकणे या सगळ्या गोष्टी माहित असणे, गरजचे होते'.
6/ 8
'कुठेही माझा अभिनय अनैसर्गिक वाटू नये, असे मला मनापासून वाटत होते. म्हणूनच कोणालाही कळू न देता मी हा क्लास लावला होता', असं सायलीनं सांगितली.
7/ 8
'शिवणकामाच्या क्लासमुळे मला शिवणकामातील बारकावे शिकता आले. ज्याचा मला 'गोष्ट एका पैठणीची'मध्ये फायदा झाला'.
8/ 8
'मुळात कोणतीही भूमिका साकारताना त्यात मन ओतून काम केले तर त्याचा सकारात्मक परिणाम दिसून येतो', असं सायलीनं म्हटलं आहे.