एव्हरग्रीन अभिनेत्री ऐश्वर्या नारकर त्यांच्या फिटनेसमुळे सध्या चर्चेत आहेत. सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेत ऐश्वर्या नारकर निगेटिव्ह भूमिकेत आहेत. वयाच्या पन्नाशीतही ऐश्वर्या नारकर इतक्या तरूण, तजेलदार कशा दिसतात. नेमका त्या कोणत्या प्रकारचा व्यायाम करतात? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. ऐश्वर्या नारकर यांचा फिटनेस मंत्रा आता समोर आलाय. एका मुलाखतीत त्यांनी याचा खुलासा केलाय. काही दिवसांंआधीच त्यांनी त्यांचे योगासनातील फोटो शेअर केलेत. त्यांच्या फोटोची प्रचंड चर्चा झाली. फिटनेसबाबत बोलताना त्या म्हणाल्या, 'दररोज किमान सकाळचा अर्धा तास मी एक्सरसाइज करते'. 'व्यायाम, योगा किंवा तुम्ही जे काही करता ते सकाळी करणं योग्य आहे असं वाटतं'. 'कारण सकाळी व्यायाम करून बाहेर पडलं की तो फ्रेशनेस असतो एनर्जी असते जी दिवसभर काम करताना राहते'. 'त्यामुळे सकाळची 20-25 मिनिटं का होईना पण घरातून एक्सरसाइज करून निघते', असं ऐश्वर्या नारकर म्हणाल्या. 'योगापेक्षा वेट्स करणं मला आवडतं', असंही त्यांनी सांगितलं. 'कार्डिओ मला आवडत नाही. कारण कार्डिओ केलं की खूप हेवी होत आणि त्याचा मला त्रास होतो. त्यामुळे मी योगा करते किंवा वेट्स करते', असं त्या म्हणाल्या.