ब्रिटनच्या रस्त्यांवर फिरण्याचा आनंद घेतेय Sara Ali Khan, पाहा निऑन आऊटफिसध्ये कूल लुक
ब्रिटनच्या रस्त्यांवर फिरतानाचे अनेक फोटो सारा अली खानने (Sara Ali Khan) तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहेत. तिथल्या रेस्टॉरंटमध्ये चविष्ट जेवणाचा आस्वादही घेतला. अभिनेत्रीने तिच्या चाहत्यांना फोटोंच्या माध्यमातून तिच्या आयुष्यात डोकावण्याची संधीही दिली. पहा अभिनेत्रीचे सुंदर फोटो-
|
1/ 8
सारा अली खान नेहमीच आयुष्याचा आनंद घेत असते. चित्रपटांमध्ये व्यस्त असूनही ती नेहमी प्रवासासाठी वेळ काढते. आता ही अभिनेत्री यूकेमध्ये मस्त एन्जॉय करताना दिसली.(Instagram/saraalikhan95)
2/ 8
साराने युनायटेड किंगडमच्या रस्त्यांवर फेरफटका मारला आणि तेथील सुंदर ठिकाणांवर फिरण्याचा आनंद लुटला. (Instagram/saraalikhan95)
3/ 8
फोटोंमध्ये सारा निऑन आउटफिटमध्ये कॅमेऱ्यासाठी पोज देताना दिसत आहे. (Instagram/saraalikhan95)
4/ 8
फोटो शेअर करताना साराने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'मोनोक्रोमॅटिक पुरेसे आहे, आता काहीतरी निऑन आणि ड्रामाटिक करण्याची वेळ आली आहे.' (Instagram/saraalikhan95)
5/ 8
सारा यूकेच्या रेस्टॉरंटमध्ये स्वादिष्ट पदार्थाचा आस्वाद घेताना दिसत आहे.(Instagram/saraalikhan95)
6/ 8
साराने गेल्या आठवड्यात सोशल मीडियावर स्वतःचे अनेक फोटो शेअर केले. फोटोंमध्ये अभिनेत्री बॅकलेस ड्रेसमध्ये पोज देताना दिसली. (Instagram/saraalikhan95)
7/ 8
सारा अली खान शेवटची 'अतरंगी रे' मध्ये दिसली होती, ज्यात धनुष आणि अक्षय कुमार मुख्य भूमिकेत होते. (Instagram/saraalikhan95)
8/ 8
सारा अली खान सध्या गुजरातमध्ये विक्रांत मॅसीसोबत तिच्या आगामी 'गॅसलाइट' या चित्रपटाचं शूटिंग करत आहे.(Instagram/saraalikhan95)