ओवाळीते भाऊराया रे...सारा अली खानने इब्राहिमसोबत साजरी केली भाऊबीज; पाहा PHOTO
बॉलिवूड अभिनेत्री सारा अली खान (Sara Ali Khan) ड्रग्ज प्रकरणानंतर सोशल मीडियापासून काहीशी लांब होती. आता मात्र ती पुन्हा अॅक्टिव्ह झाली आहे. तिने आपल्या भावासोबतचे भाऊबीजेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
|
1/ 7
गेल्या काही दिवसांपासून अभिनेत्री सारा अली खानच्या (Sara Ali Khan) आयुष्यात अनेक अडचणी होत्या. ड्रग केसमध्ये अडकल्यामुळे तिला निगेटिव्ह पब्लिसिटीला सामोरं जावं लागलं होतं. पण हा सगळा तणाव दूर करत साराने भाऊबीज साजरी केली.
2/ 7
सारा आणि इब्राहिमने पारंपरिक पद्धतीने भाऊबीज साजरी केली. साराने भावासोबत काही फोटोही शेअर केले आहेत.
3/ 7
या फोटोंमध्ये सारा अली खान आणि इब्राहिम खानमधलं बॉडिंग दिसून येत आहे. साराने फोटो शेअर करत सर्व चाहत्यांनाही शुभेच्छा दिल्या आहेत.
4/ 7
सारा इब्राहिमला मस्करीमध्ये इगी पॉर्टर म्हणते. सोशल मीडियावरही तिने इगी पॉर्टर या नावाचा उल्लेख केला आहे.
5/ 7
ड्रग्ज केसमध्ये नाव आल्यानंतर सारा सोशल मीडियापासून काही दिवस लांब होती. तिने कोणतीही पोस्ट शेअर केली नव्हती.
6/ 7
आता सारा पुन्हा सक्रीय झाल्यामुळे तिच्या चाहत्यांना आनंद झाला आहे. सारा अली खान अतरंगी रे या सिनेमामध्ये झळकणार आहे.
7/ 7
अतरंगी रे या सिनेमामध्ये सारा आणि धनुष अशी फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. अक्षय कुमारही या सिनेमामध्ये काम करत आहे.