मराठी अभिनेता संकर्षण कऱ्हाडे सतत कोणत्या ना कोणत्या कामात व्यग्र असतो.सध्या तो 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत काम करत आहे. संकर्षण अनेक मालिका, नाटक, रिऍलिटी शोमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत असतो. हा अभिनेता सोशल मीडियावरसुद्धा प्रचंड सक्रिय असतो. तो सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत आपल्या अपडेट्स देत असतो. आजही अभिनेत्याने असंच काहीसं केलं आहे. संकर्षणने इस्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत खास अपडेट दिली आहे. संकर्षण सध्या लंडनला निघाला आहे. परंतु व्हेकेशनसाठी नव्हे तर एका खास कारणासाठी अभिनेत्याने पोस्ट करत लिहिलंय, ''दोस्तांनो .. लंडनला जाउन येतो .. '' ''“तूम्हणशील तसं आणि सारखं काहीतरी होतंय” ह्या दोन्ही मी लिहिलेल्या नाटकांचे २/२ प्रयोग आहेत..शुभेच्छा पाठीशी कायम असु द्या'' . म्हणजेच अभिनेता आपल्या नाटकाच्या प्रयोगाच्या निमित्ताने लंडन दौऱ्यावर निघाला आहे.