आई नर्गिसनंतर संजय दत्तलाही कॅन्सरनं गाठलं; या सेलेब्रिटींनी कॅन्सरला दिली फाईट
संजय दत्त यांना lung Cancer असल्याची धक्कादायक बातमी आली आहे. बॉलिवूडला यापूर्वीसुद्धा कॅन्सरने अनेक धक्के दिले होते. त्यातले काही यशस्वी आणि काही अपयशी ठरलेले लढवय्ये.
|
1/ 11
सोनाली बेंद्रेने कॅन्सरशी यशस्वी लढा दिला. तिला जुलै 2018 मेटॅस्टॅटिक कॅन्सरनं गाठलं. पण तिने जिद्दीने कॅन्सरवर मात केली.
2/ 11
संजय दत्तला फुफ्फुसाच्या कर्करोगाचं निदान झालं आहे. हाच Lung cancer युवराज सिंगलाही झाला होता. त्यावर त्याने यशस्वी मात केली आणि पुन्हा खेळायला मैदानात उभा राहिला.
3/ 11
राकेश रोशन यांनाही एक प्रकारचा घशाचा कर्करोग झाला होता. पण वेळीच उपचार मिळाल्याने ते या आजारातून बाहेर आले आहेत.
4/ 11
मनीषा कोईरालानेदेखील कॅन्सरविरोधात यशस्वी लढाई करत या आजाराला परतवून लावलं.
5/ 11
1981 मध्ये संजय दत्तची आई आणि बॉलिवूडच्या प्रसिद्ध अभिनेत्री नर्गिस यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांना पॅनक्रियाटिक कॅन्सर होता. ज्यामुळे त्या बराच काळ हॉस्पिटलमध्ये होत्या.
6/ 11
ऋषी कपूर, इरफान खान आणि अशा आणखी काही अभिनेत्यांची फाईट मात्र अयशस्वी ठरली. ऋषी कपूर यांचं याच वर्षी एप्रिलमध्ये कॅन्सरमुळे निधन झालं.
7/ 11
बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता इरफान खाननं त्यापूर्वी काही दिवस सर्वांचा निरोप घेतला. न्यूरोइंडोक्राइन या कॅन्सरनं तो मागच्या 2 वर्षांपासून आजारी होता. 2018 मध्ये त्याला या कॅन्सरचं निदान झालं होतं.
8/ 11
2017 मध्ये दिग्गज अभिनेता विनोद खन्ना यांचं वयाच्या 70 व्या वर्षी निधन झालं होतं. विनोद खन्ना यांना ब्लड कॅन्सर होता. ज्यामुळे ते बराच काळ रुग्णालयात उपचार घेत होते.
9/ 11
एकेकाळचे बॉलिवूड सुपरस्टार राजेश खन्ना सुद्धा कॅन्सरची लढाई हारले होते. बराच काळ कॅन्सरशी झुंज दिल्यानंतर त्यांनी 2012 मध्ये आपल्या घरीच अखेरचा श्वास घेतला होता.
10/ 11
बॉलिवूड अभिनेता फिरोज खान यांचंही कॅन्सरमुळेच निधन झालं होतं. 2009 मध्ये वयाच्या 69 व्या वर्षी त्यांचं कॅन्सरमुळे निधन झालं होतं.
11/ 11
अभिनेत्री डिंपल कपाडिया यांची बहीण सिंपल यांचंही कॅन्सरमुळे निधन झालं होतं. 3 वर्ष कॅन्सरशी लढल्यानंतर त्यांनी 2009 मध्ये वयाच्या 51 व्या वर्षी जगाचा निरोप घेतला होता.