‘देवमाणूस’ या लोकप्रिय मालिकेचा उत्तरार्ध सुरू झाला आहे. त्यामुळे मालिकेच्या कथानकात दररोज नवनवे ट्विस्ट पाहायला मिळत आहेत. चंदा डॉक्टरकडून तिचे पैसे घ्यायला सुरू आजीच्या वाड्यात राहायला लागलीय. ती डॉक्टरकडे वारंवार पैशांची मागणी करतेय. दरम्यान या मालिकेत आता आणखी एका नव्या अभिनेत्रीची एण्ट्री झाली आहे. पाहुयात ही अभिनेत्री नक्की आहे तरी कोण? देवमाणूसमध्ये आलेल्या नव्या अभिनेत्रीचं नाव संजना काळे असं आहे. संजना ही एक प्रसिद्ध अभिनेत्री, डान्सर आणि कोरोग्राफर आहे. संजना काळे कलर्स मराठीवरील ‘बाळुमामाच्या नावानं चांग भलं’ या मालिकेतून प्रकाशझोतात आली होती. याशिवाय ती गेट टू गेदर या चित्रपटात देखील झळकली होती. तिने या चित्रपटात महत्वाची भूमिका बजावली होती. देवमाणूस मालिकेमुळे आता ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. संजनाच्या एण्ट्रीमुळे मालिकेत आता आणखी एक ट्विस्ट आला आहे. आता तिला देखील डॉक्टर आपल्या सापळ्यात अडकवून लुटणार का? हे पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत.