साऊथ सिने इंडस्ट्रीमधील पॉवरकपल म्हणून समंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्य यांना ओळखलं जात होतं. या दोघांना प्रचंड पसंत केलं जात होतं.
2/ 8
परंतु गेल्यावर्षी या दोघांमध्ये काहीतरी बिनसल्याच्या सतत चर्चा सुरु होत्या. दरम्यान या दोघांनी स्वतः सोशल मीडियाद्वारे आपण विभक्त होत असल्याची माहिती दिली होती.
3/ 8
मात्र यांच्या घटस्फोटाने चाहत्यांना धक्का बसला होता. चाहते निराश झाले होते. त्यांनी पुन्हा एकत्र येण्याची अपेक्षा केली जात होती.
4/ 8
परंतु आता सर्व अपेक्षा संपल्याचं दिसत आहे, कारण समंथाने नागा चैतन्यला आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर अनफॉलो केलेलं आहे.
5/ 8
काही दिवसांपूर्वी समंथाने आपल्या इन्स्टावरून नागा चैतन्यसोबतच्या आपल्या सर्व पोस्ट डिलीट केल्या होत्या.
6/ 8
तसेच घटस्फोटाच्या आधीच अभिनेत्रीने आपल्या नावासमोरून पतीचं आडनाव हटवलं होतं.
7/ 8
मीडिया रिपोर्टनुसार नुकतंच समंथाने अख्किनेनी कुटुंबाकडून लग्नात भेट मिळालेली महागडी साडीसुद्धा परत केली होती.
8/ 8
समंथा आणि नागा चैतन्यने 4 वर्षाच्या संसारानंतर घटस्फोटाचा निर्णय घेऊन सर्वांनाच धक्का दिला होता.