

सर्वांना माहीत आहेच की, सलमान खानच्या आयुष्यातली सर्वात जवळची व्यक्ती त्याची आई आहे. सलमान आईसाठी काहीही करू शकतो.


नुकताच सलमान भारत सिनेमाच्या शूटिंगहून मुंबईत आला. त्याने आईच्या वाढदिवसानिमित्त अर्पिताच्या घरी जंगी पार्टी केली. सकाळी ४.३० पर्यंत तो पार्टीचा आनंद लूटत होता


आईची बर्थडे पार्टीअर्पिताच्या घरी झाली असली तरी तिने एकटीनेच या पार्टीचं आयोजन केलं. अर्पिताचा जोडीदार आयुष सध्या त्याच्या दुसऱ्या सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यग्र असल्यामुळे तो या पार्टीच नव्हता. आयुष शर्माने नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘लव्हयात्री’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये एंट्री केली.


खान कुटुंबीयांच्या पार्टीमध्ये अरबाज खानसोबत त्याची गर्लफ्रेंड गॉर्जिया अँड्रीयानीदेखील हजर होती.


अरबाज खान आणि मलायाक अरोराचा घटस्फोट झाला असला तरी ती अनेकदा खान कुटुंबियांकडे असलेल्या पार्टीला आवर्जुन उपस्थित राहते. आतापर्यंत ती सलमानसमोर कधी आली नव्हती.