बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्यापैकी एक अभिनेता म्हणजे सलमाना खान होय. सलमान खानची खरं तर वेगळी ओळख करून द्यायची गरज नाही. वाद आणि सलमना हे खरं जुनं समीकरण आहे. म्हणून तर त्या बॅड बॉय म्हणून ओळखतात. याला कारणही तसंच आहे. कधी हिट अॅण्ड रन केस तर कधी काळवीट शिकार प्रकरण अशा कोणत्या कोणत्या कारणामुळं सलमाना चर्चेत असतो. पण हा सलमानचा पास्ट आहे. बॅड बॉयची इमेज असलेला सलमानकडून मात्र काही गोष्टी खरचं शिकण्यासारख्या आहेत.
2013मध्ये 'बीईंग ह्यूमन' संस्थेनं राज्यातल्या बीड, उस्मानाबाद, जालना, औरंगाबाद आणि नांदेड या 5 जिल्ह्यांमध्ये 2000 लीटर क्षमता असलेल्या 2500 पाण्याच्या टँकचं वाटप केलं होतं. असं असलं तरी, सलमाननं त्याच्या या सामाजिक कामाचा वापर त्याच्याविरोधातील गुन्ह्याच्या खटल्यांमधून बाहेर पडण्यासाठी केला, असा आरोपही त्याच्यावर वारंवार करण्यात
सलमान खाननं अनेक कलाकारांना बॉलीवूडमध्ये ब्रेक दिला आहे. यामध्ये संगीतकार हिमेश रेशमिया, अभिनेता सूरज पांचोली, अथिया शेट्टी, सोनाक्षी सिन्हा, झरीन खान यांचा आहे. बॉलिवूडमध्ये एक सिनेमा मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते मात्र सलमान खान नेहमीच नवीन कलाकारांच्या पाठीमागं उभं राहताना दिसतो. याबाबत त्याचं कौतुक करावं तेवढं थोडं आहे.
सलमान खाननं चित्रपट क्षेत्रात बॉडी बिल्डिंगचा ट्रेंड सुरू केला. त्याच्या फिटनेसचं कौतुक कराव तेवढं थोडं आहे. अनेक कलाकारांना त्यांने याबद्दल मार्गदर्शन केलं आहे. आमिर खान, अर्जुन कपूर, रणबीर कपूर यांना देखील त्यांने बॉडी बिल्डिंगबद्दल मार्गदर्शन केलं आहे. केवळ अर्जुन कपूरच नाही, तर सोनाक्षी सिन्हा, वरुण धवन यांनाही सलमान खाननंच वर्क आऊटसाठी मदत केली होती.