सोमीनं वयाच्या सोळाव्या वर्षी सलमान खानचा ‘मैने प्यार किया’ (maine pyar kiya) हा चित्रपट पहिला होता. आणि त्यांनतर ती सलमानच्या प्रेमात पडली होती. तिला सलमान खानसोबत लग्नं करायचं होतं. त्यामुळे ती भारतात यायची तयारी करू लागली. तिनं आपल्या आईलासुद्धा हे सांगितलं. मात्र तिनं आपल्या वडिलांना असं सांगितलं. भारतात असणाऱ्या आपल्या काही नातेवाईकांना भेटण्याची माझी इच्छा आहे. आणि त्यासाठी मी भारतात जात आहे, असंही ती सांगते.
नवभारत टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं एक धक्कदायक खुलासा केला. ती म्हणाली, “जेव्हा मी पाच वर्षांची होते तेव्हा घरातील नोकरानं माझ्यासोबत तीन वेळा लैंगिक गैरवर्तणुक केली होती. त्यानंतर वयाच्या नवव्या वर्षी इमारतीच्या वॉचमननं माझ्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी मी पाकिस्तानात राहात होते.