Bigg Boss मुळं वाढली अभिनेत्रीची लोकप्रियता; काही तासांत मिळाले 14 लाख फॉलोअर्स
चित्रपटात नाना पाटेकरांसोबत काम केलेली अभिनेत्री ग्लॅमरस फोटोंमुळं चर्चेत
|
1/ 10
साक्षी अग्रवाल ही दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
2/ 10
साक्षी बिग बॉस या रिअलिटी शोमुळं खऱ्या अर्थानं प्रकाशझोतात आली होती.
3/ 10
बिग बॉसमधून बाहेर पडताच तब्बल 14 लाख नवे चाहते तिला सोशल मीडियावर फॉलो करु लागले. यावरुनच साक्षीच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो.
4/ 10
त्यामुळं अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड चर्चेत असते.
5/ 10
ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते.
6/ 10
यावेळी देखील तिनं असंच एक ग्लॅमरस फोटोशूट केलं आहे. तिचे हे फोटो पाहून चाहते देखील अवाक् झाले आहेत.
7/ 10
साक्षी येत्या काळात ‘द नाईट’ या हॉरर चित्रपटात झळकणार आहे. हा चित्रपट तमिळ, तेलुगु आणि हिंदी या भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. अलिकडेच तिनं या चित्रपटाचे काही पोस्टर देखील शेअर केले होते.
8/ 10
साक्षीनं 2013 साली राजा राणी या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती.
9/ 10
त्यानंतर तिनं सॉफ्टवेअर गुंडा, टेडी, का का पो, कट्टी स्टोरी या चित्रपटांमध्ये काम केलं.
10/ 10
साक्षीला खरी प्रसिद्धी मिळाली ती रजनीकांत यांच्या काला या चित्रपटामुळं. विशेष म्हणजे या चित्रपटात मराठी अभिनेते नाना पाटेकर देखील झळकले होते.