सैराट फेम अभिनेत्री रिंकू राजगुरू सोशल मीडियावर सक्रीय असते. नुकतंच रिंकूला मुंबईत एका ठिकाणी स्पॉट करण्यात आलं. नेहमी ग्लॅम आणि मेकअपमध्ये असणारी रिंकू यावेळी अगदी कॅज्युअल लुकमध्ये दिसली. रिंकूनं यावेळी मेकअपही केला नव्हता. तिच्या नो मेकअप लुकनं ही सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. रिंकूला पाहण्यासाठी पापाराझींनी आणि तिच्या चाहत्यांनी गर्दी केली होती. पण रिंकूचा नो मेकअप लुक पाहण्यासाठी आणखी एक खास व्यक्ती तिथं आली होती. पापाराझींना फोटो देऊन रिंकू मागे वळली तेव्हा तिच्या मागे एक क्यूट मांजर तिच्याकडे एकटक पाहत होती. यावेळी रिंकूबरोबरच मागे बसलेल्या मांजरीनंही सर्वांचं लक्ष वेधलं.