'सैराट' या मराठी चित्रपटाने अक्षरशः इतिहास रचला आहे. या चित्रपटातून आर्ची आणि परश्याच्या रुपात रिंकू राजगुरू आणि आकाश ठोसर घराघरात पोहोचले आहेत. सैराटमधील सर्वच कलाकरांना रातोरात स्टारडम मिळालं होतं. रिंकू आणि आकाशने तर हिंदी मनोरंजनसृष्टीमध्येसुद्धा आपला ठसा उमठवला आहे. नुकताच आकाश आणि रिंकूने सोशल मीडियावर आपले काही खास फोटो शेयर केले आहेत. दोघेही खूप दिवसांनी एकत्र आल्याचं रिंकूने आपल्या कॅप्शनमध्ये म्हटलं आहे. त्यामुळे दोघही खुपचं खुश दिसत आहेत. फोटोमध्ये दोघेही मजेशीर पोझ देत आहेत. सोबतचं एकमेकांची कंपनी खुपचं एन्जॉय करताना दिसत आहेत. तसेच दोघांमध्ये आधीच्या तुलनेत मोठा फरक दिसून येत आहे. दोघेही अतिशय फिटनेस फ्रिक झाले आहेत. या दोघांच्या फिटनेसची चर्चा सतत सोशल मीडियावर सुरु असते.