परश्यासोबतची 'ती' नक्की आहे तरी कोण? अभिनेत्यानं स्वतःच शेअर केले PHOTOS
सैराटमध्ये तर आर्ची आणि परश्याच्या जोडीनं सर्वांना वेड लावलं होतं मात्र आकाशाच्या रिअल लाइफमधली आर्ची कोण याची उत्सुकता मात्र सर्वांनाच लागून राहिली आहे.
|
1/ 9
नागराज मंजुळेंच्या 'सैराट' सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण करणारा परश्या म्हणजेच आकाश ठोसर सध्या तरूणींच्या गळ्यातला ताईत बनला आहे.
2/ 9
या सिनेमानंतर अनेक मुली आकाशच्या लुकवर फिदा झाल्या होत्या. त्यामुळे त्याच्या चाहत्यांमध्ये मुलींची संख्या जरा जास्तच आहे.
3/ 9
सैराटमध्ये तर आर्ची आणि परश्याच्या जोडीनं सर्वांना वेड लावलं होतं मात्र आकाशाच्या रिअल लाइफमधली आर्ची कोण याची उत्सुकता मात्र सर्वांनाच लागून राहिली आहे.
4/ 9
नुकतेच आकाशनं त्याच्या इस्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. ज्यात त्याच्यसोबत एक मुलगी दिसत आहे.
5/ 9
आकाशसोबत या मुलीचे फोटो पाहिल्यावर हिच त्याची रिअल लाइफ आर्ची तर नाही ना? असा प्रश्न त्याच्या लाखो चाहत्यांना पडला.
6/ 9
पण प्रत्यक्षात मात्र हे प्रकरण थोडं वेगळं आहे. आकाशनं त्याच्या इनस्टाग्रामवर एका मुलीसोबतचे फोटो शेअर केले आहेत.
7/ 9
आकाशनं शेअर केलेल्या या फोटोमध्ये दिसणारी ती मुलगी दुसरी तिसरी कोणी नसून स्वतः आकाशाच आहे. त्यानं हे सर्व फोटो फेस अॅपमध्ये एडिट केले आहेत.
8/ 9
हे फोटो शेअर करताना आकाशनं त्याच्या चाहत्यांना चॅलेंज सुद्धा दिलं आहे. 'आहे का कुणी अशी? असेल तर सांगा!' असं कॅप्शन त्यानं या फोटोंना दिलं आहे.
9/ 9
गेले काही दिवस चेहरा बदलून स्त्रियांचे पुरूषी रूप किंवा पुरूषांचा महिला वेष कसा दिसेल याबद्दलच्या फोटोंचा ट्रेंड आला आहे. त्याचीच आकाशला भुरळ पडल्याचे दिसून आले. (सर्व फोटो- आकाश ठोसर इन्स्टाग्राम)