मराठीच नाही तर बॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाची छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे सई ताम्हणकर. सईनं वैविध्यपूर्ण भूमिका करत प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. सई सोशल मीडियावरही बरीच सक्रिय असते. निरनिराळे फोटो आणि व्हिडीओ सई चाहत्यांसोबत शेअर करत असते. सईनं नुकतेच इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले आहेत. सोशल मीडिया ट्रेंड फॉलो करत सईनं नवीन फिल्टर वापरुन फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये सईचा अनोखा अंदाज पहायला मिळत असून चाहते तिच्या या फोटोंना पसंत करत आहेत. काही वेळातच सईचे हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.