मराठमोळी अभिनेत्री सई ताम्हणकर सोशल मीडियावर नेहमी अॅक्टीव असते. सईने नुकतेच शॉर्ट ड्रेसमधील काही फोटो शेअर केले आहेत. सईचा हा शॉर्ट आणि सेक्सी अंदाच चाहत्यांना भलताच आवडलेला आहे. सईच्या या फोटोंवर कमेंटचा वर्षाव होत आहे. सईचा फॅशनेबल आणि स्टनिंग अंदाच चाहत्यांना आवडलेला आहे. सई नेहमीच तिचे फोटो व व्हिडिओ चाहत्यांसोबत शेअर करत असते. सईने मराठीसोबत हिंदीमध्ये देखील अभिनयाचा ठसा उमठविला आहे. सई मुळची सांगलीची आहे मात्र सध्या ती कामानिमित्त मुंबईत राहते. सई नेहमीच तिच्या हटके फोटोशूटमुळे चर्चेत असते. सईने छोट्या पडद्यावरुन अभिनय क्षेत्रात पदार्पण केले. हळूहळु तिने स्वबळावर मोठ्या पडद्यावर जम बसवला. मराठीसोबतच सईने हिंदीत देखील ‘हंटर’, ‘लव्ह-सोनियो’ सारख्या चित्रपटात प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. तिच्या अभिनयाच्या वेगवेगळ्या पैलूंमुळे तिने प्रेक्षकांचे मन जिंकले आहे.