अभिनेत्री सई ताम्हणकरनं तिच्या प्रेक्षकांना आनंदाची बातमी दिली आहे.
2/ 8
मराठमोळी सई आता ग्लोबल न्यूज चॅनेलवर झळकणार आहे.
3/ 8
नॅशनल जिओग्राफिक इंडियाच्या आगामी डॉक्यूमेंटरी सिरीज-'पोस्टकार्ड्स फ्रॉम महाराष्ट्र' ही सीरिज होस्ट करणार आहे.
4/ 8
सात भागांची ही सीरिज 29 डिसेंबर 2022 पासून सुरू होणाऱ्या नॅशनल जिओग्राफिकवर ही सीरिज पाहायला मिळणार आहे.
5/ 8
नव्या प्रोजेक्टविषयी बोलताना सई म्हणाली, 'महाराष्ट्र पर्यटनाच्या सहकार्याने नॅशनल जिओग्राफिक-एक ब्रँड जो त्याच्या अभ्यासपूर्ण कथाकथनासाठी ओळखला जातो'.
6/ 8
'माझे स्वतःचे राज्य एक्सप्लोर करणे ही माझ्यासाठी खरोखरच सन्मानाची गोष्ट आहे'.
7/ 8
'या संधीच्या माध्यमातून मला गूढ सौंदर्य, रुचकर पदार्थ आणि प्रवासासारखी समृद्ध मराठी संस्कृती यांबद्दलचं माझं प्रेम अनुभवण्याची आणि पुन्हा एकदा उजाळा देण्याची संधी मिळाली'.
8/ 8
'या सीरिजचा भाग असल्यामुळे मला मराठी मुलगी असल्याचा अभिमान वाटला आणि या मालिकेचे माझ्या हृदयात नेहमीच एक विशेष स्थान असेल', असं सई म्हणाली.