Sai Pallavi: कधीच मेकअप का नाही करत साई पल्लवी? साऊथ सुंदरीने सांगितलं खरं कारण
Sai Pallavi no makeup PHOTOS: बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत सर्वच अभिनेत्री चेहऱ्यावर मेकअप करुन स्वतःला पडद्यावर सादर करत असतात. मेकअपमुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडते.
बॉलिवूडपासून हॉलिवूडपर्यंत सर्वच अभिनेत्री चेहऱ्यावर मेकअप करुन स्वतःला पडद्यावर सादर करत असतात. मेकअपमुळे त्यांच्या सौंदर्यात भर पडते.
2/ 8
परंतु एक सेलिब्रेटी अशी आहे जी मेकअपपासून चार हात दूर असते. ती म्हणजे साऊथ अभिनेत्री साईपल्लवी होय. साईपल्लवी सिनेमांमध्ये मेकअप करणं टाळते. अभिनेत्रीने आता यामागचं कारण उघड केलं आहे.
3/ 8
साई पल्लवी ही टॉलिवूडमधील अशी अभिनेत्री आहे जी विना मेकअप लुकमध्येही प्रेक्षकांना वेड लावते. मल्याळम चित्रपट 'प्रेमम' मधून साईपल्लवीने सिनेमांमध्ये पदार्पण केलं होतं.
4/ 8
नुकतंच एका वेब पोर्टलला दिलेल्या मुलाखतीत साईपल्लवीने आपण मेकअप का करत नाही याच कारण सांगितलं आहे. याबाबत बोलताना ती म्हणाली,'मेकअपमुळे एक प्रकारचा दबाव जाणवतो. नो मेकअपमध्ये मला आत्मविश्वास वाटतो'.
5/ 8
परंतु हे कदाचित मला वाटत असावं इतरांचं मला नाही माहित. पण ज्यांना असं वाटतं त्यांनी नो मेकअप लूकमध्ये स्वतः ला सादर करण्याचा विचार असेल तर त्यांनी तसं नक्की करावं.
6/ 8
अभिनेत्रीने सांगितलं की, 'चित्रपट काय आहे हे जाणून घेण्यासाठी मी स्वतः दिग्दर्शक किंवा निर्मात्याशी बोलणं पसंत करते. मला कोणत्याही मध्यस्थीची गरज नाही'.
7/ 8
अभिनेत्री एक उत्तम डान्सर आहे. साईपल्लवीने माधुरी दीक्षित, ऐश्वर्या राय आणि सरोज खान यांना आपली प्रेरणा म्हटलं आहे.
8/ 8
अभिनेत्री म्हणाली, 'मी मोठी होत असताना माझ्या लक्षात आलं नव्हतं की, नृत्य मला शिस्त लावण्यात किंवा माझ्या शरीरात लय आणण्यात मोठी भूमिका बजावेल. तीन वर्षे मी फक्त डोला रे डोलावर डान्स करत होते'.