सई लोकूरचा मराठमोळा साज; पाहा अशी साजरी केली पहिली वटपौर्णिमा
विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात.
|
1/ 5
हिंदू पंचांगानुसार ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेचा हा दिवस “वटपौर्णिमा” (Vat Purnima) म्हणून साजरा केला जातो. या पार्श्वभूमीवर आज वटपौर्णिमा साजरी केली जात आहे.
2/ 5
विवाहित महिला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी हे व्रत करतात. मनोरंजनसृष्टीतील अनेक नामांकित अभिनेत्रींनी देखील मोठ्या उत्साहानं वटपौर्णिमा साजरी करत आहेत.
3/ 5
बिग बॉस मराठी या शोमधून नावारुपास आलेली अभिनेत्री सई लोकूर सुद्धा यंदा आपली पहिली वटपौर्मिणा साजरी करत आहे. त्या निमित्तानं तिनं काही खास फोटो शेअर केले आहेत.
4/ 5
या फोटोंमध्ये तिनं पारंपारिक वेश परिधान केला आहे. सईचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे. चाहत्यांनी तिच्या या सोज्वळ लुकवर कौतुकाचा वर्षाव केला आहे.
5/ 5
वटवृक्षाची पूजा करुन सावित्रीने आपला पती सत्यवान यांच्या प्राणाची रक्षा केली होती. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.