सबा कमर ही पाकिस्तान सिनेसृष्टीतील एक नामांकित अभिनेत्री आहे. पाकिस्तानी चित्रपटांसोबतच तिनं काही बॉलिवूड चित्रपटांमध्येही काम केलं आहे. 36 वर्षीय सबा लवकरच लग्न बंधनात अडकणार अशी चर्चा आहे. अभिनयासोबतच ती सोशल मीडियावर देखील प्रचंड सक्रिय असते. ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओजच्या माध्यमातून ती कायम आपल्या चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. अलिकडेच तिनं स्वत:चे काही फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते. या फोटोंमुळेच सबाच्या लग्नाच्या चर्चा होऊ लागल्या आहेत. तिच्या फोटोंवर हजारो चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या होत्या. यापैकी एक चाहत्याने तर तिला थेट लग्नाची मागणीच घातली होती. तू माझ्याशी लग्न करशील का? असा थेट सवाल या चाहत्यानं तिला केला. अन् आश्चर्याची बाब म्हणजे या फोटोवर सबानं देखील कबूल है म्हणत त्याला होकार दिला. या चाहत्याचं नाव अजीम संग असं आहे. तो पाकिस्तानमधील एक प्रसिद्ध ब्लॉगर आहे. ती लवकरच अजीमसोबत लग्न करणार अशी चर्चा आहे. अनेकांनी तिला या लग्नासाठी शुभेच्छा देखील दिल्या आहेत. यापूर्वी ती संगीतकार बिलाल सईदसोबत लग्न करणार होती अशा चर्चा होत्या. दोघांचे फोटो देखील व्हायरल झाले होते.