दिल ना उम्मीद ही सही या मालिकेतून लोकप्रिय झालेली सबा बुखारी ही पाकिस्तानी मनोरंजनसृष्टीतील एक प्रसिद्ध अभिनेत्री आहे. (Saba Bukhari/Instagram)
2/ 10
अलिकडेच बीबीसी उर्दूला दिलेल्या मुलाखतीत तिनं आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं तिच्यासोबत घडलेला एक धक्कादायक अनुभव सांगितला. (Saba Bukhari/Instagram)
3/ 10
या घटनेमुळं पाकिस्तानी मनोरंजनसृष्टीचा काळा चेहरा जगासमोर आला अशी टीका केली जात आहे. (Saba Bukhari/Instagram)
4/ 10
तिनं 2015 साली अली की अम्मा या मालिकेतून छोट्या पडद्यावर पदार्पण केलं होतं. परंतु खरं तर त्याआधीच तिला एका मालिकेत काम करण्याची संधी मिळाली होती. (Saba Bukhari/Instagram)
5/ 10
सबानं रितसर ऑडिशन देऊन तो रोल मिळवला होता. परंतु दिग्दर्शक इतक्या सहजगतीनं तिला काम देण्यास तयार नव्हता. (Saba Bukhari/Instagram)
6/ 10
जर तुला काम हवं असेल तर तुला कॉम्प्रोमाईज करावं लागेल अन्यथा कामाचे पैसे मिळणार नाहीत. अशी थेट धमकी तिला मिळाली होती. (Saba Bukhari/Instagram)
7/ 10
ही धमकी ऐकून सबा घाबरली व तिनं पैसे देऊ नका पण काही एपिसोड काम तरी करु द्या अशी विनंती तिनं दिग्दर्शकाला केली. परंतु तरी देखील निर्माते तयार नव्हते. (Saba Bukhari/Instagram)
8/ 10
अखेर संतापलेल्या सबानं त्या मालिकेत काम करण्यास नकार दिला. असा अनुभव या मुलाखतीत तिनं सांगितला. (Saba Bukhari/Instagram)
9/ 10
तिनं सांगितलेल्या या अनुभवामुळं सध्या पाकिस्तानी मनोरंजनसृष्टीवर जोरदार टीका होत आहे. तिथं कशाप्रकारे अभिनेत्रींचं शोषण केलं जातं अशी चर्चा सर्वत्र रंगली आहे. (Saba Bukhari/Instagram)
10/ 10
सबानं सोशल मीडियावर देखील याबाबत एक पोस्ट शेअर केली होती. (Saba Bukhari/Instagram)