

सर्वांची लाडकी Little Champ अर्थात कार्तिकी गायकवडचा साखरपुडा संपन्न झाला आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम @kartiki_kalyanji_gaikwad9)


26 जुलै रोजी काही मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा साखरपुड्याचा कार्यक्रम पार पडला (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम @kartiki_kalyanji_gaikwad9)


यावेळी कार्तिकीने लाल रंगाचा गाऊन घातला होता. यावेळी तिचे सौंदर्य आणखीनच खुलून दिसत होते. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम @kartiki_kalyanji_gaikwad9)


वडिलांच्या मित्रपरिवारातीलच पिसे कुटुंबातील रोनित पिसे याच्यासोबत कार्तिकीची लग्नगाठ बांधली जाणार आहे. मेकॅनिकल इंजिनिअर असलेल्या रोनित पिसे याचा स्वत:चा व्यवसायही आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम @kartiki_kalyanji_gaikwad9)


'हे सगळं अचानक ठरलं. आमचं अरेंज मॅरेज असून वडिलांनी हा महत्वाचा निर्णय घेतला आहे. संगीताचा वारसा मी पुढेही जपणार आहे. रोनितला देखील संगीताची आवड आहे. त्याला उत्तम तबला वाजवता येतो. त्याने तबल्याच्या तीन परीक्षा दिल्या आहेत,' अशी प्रतिक्रिया कार्तिकीने लग्न ठरल्यावर दिली होती. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम @kartiki_kalyanji_gaikwad9)


सारेगमप लिटिल चँप्समधून सर्वांच्या घराघरामध्ये कार्तिकी गायकवाड हा चेहरा पोहोचला. तिने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य केले आहे. (फोटो सौजन्य - इन्स्टाग्राम @kartiki_kalyanji_gaikwad9)