काहे दिया परदेस या मालिकेतून घराघरात पोहोचलेली सायली संजीव ही मराठी मनोरंजनसृष्टीतील एक लोकप्रिय अभिनेत्री म्हणून ओळखली जाते.
2/ 10
गेल्या काही काळात ती अभिनयासोबतच आपल्या खासगी आयुष्यामुळं देखील चर्चेत राहु लागली आहे.
3/ 10
अलिकडेच तिनं स्वत:चे काही ग्लॅमरस फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केले होते.
4/ 10
या फोटोंवर चेन्नई सुपर किंगमधील ऋतुराज गायकवाड यानं देखील कॉमेंट केली होती.
5/ 10
सायली ही चेन्नईच्या टीमची फॅन आहे त्यामुळं तिनं देखील त्याच्या कॉमेंटवर प्रतिक्रिया देत त्याचे आभार मानले.
6/ 10
या प्रतिक्रियांमुळं दोघांमध्ये काहीतरी शिजतंय असा अशी चर्चा सोशल मीडियावर रंगू लागली.
7/ 10
ऋतुराज सायलीच्या प्रेमात पडला आहे की काय? अशी शंका चाहते घेऊ लागले.
8/ 10
अखेर त्यानं एक पोस्ट शेअर करुन या चर्चेला पूर्णविराम दिला आहे.
9/ 10
'माझी विकेट फक्त गोलंदाजच घेऊ शकतो आणि क्लिन बोल्ड सुद्धा. कुणाचं काय तर कुणाचं काय' अशी कॉमेंट करत त्यानं दोघांमध्ये काहीही सुरु नसल्याचं स्पष्ट केलं.
10/ 10
अर्थात त्याच्या या पोस्टवर चाहत्यांनी अद्याप पुर्णपणे विश्वास ठेवलेला नाही. कदाचित चर्चा टाळण्यासाठी त्यानं हा पवित्रा स्विकारला असावा अशीही शंका चाहते उपस्थित करत आहेत.