

माजी कृषी मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची तिसरी पिढी राजकारणात सक्रिय झालेली आहे. शरद पवार यांचे नातू आणि अजित पवार यांचा पुतण्या रोहित हा पार्थ यांच्यापाठोपाठ राजकारणाचे धडे गिरवत आहे.


विशेष म्हणजे, चेन्नई येथे सुपरस्टार रजनीकांत यांच्या मुलीच्या लग्न समारंभात रोहित पवार यांनी हजेरी लावली. या लग्नसोहळ्यादरम्यान सेलिब्रेटींसोबत त्यांचे फोटो व्हायरल झाले आहे.


या लग्नसोहळ्यात रोहित पवार यांनी रजनीकांत यांची भेट घेतली आणि नवविवाहित दाम्पत्याला लग्नाच्या शुभेच्छा दिल्यात.


सुपरस्टार रजनीकांतची मुलगी सौदर्याचे दुसरे लग्न मोठ्या थाटामाटात पार पडले. या लग्नात तिचा चार वर्षाचा मुलगाही होता.


सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी सौंदर्या रजनीकांत आणि व्यावसायिक विशनगन वनानगामुडी आज ११ फेब्रुवारीला लग्नबंधनात अडकले. (छाया सौजन्य- स्पेशल अरेंजमेन्ट)


चैन्नईतील द लीला पॅलेस या पंचतारांकित हॉटेलमध्ये विवाह सोहळा पार पडला. हे हॉटेल एमआरसी नगरमध्ये येतं. हॉटेलच्या आसपास अनेक चाहते आणि मीडियाची लोकं जमा झाली आहेत. लग्नाच्या विधी सकाळी ११ वाजल्यापासून सुरू झाल्या. विधीनंतर दोन्ही कुटुंब एकत्र जेवणार आहेत. (छाया सौजन्य- स्पेशल अरेंजमेन्ट)


या लग्नाला दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील दिग्गज कलाकार आणि अनेक नेते मंडळी नववधूला आशीर्वाद द्यायला आले होते. लग्नाला कमल हसन यांनीही हजेरी लावली. (छाया सौजन्य- स्पेशल अरेंजमेन्ट)


प्रसिद्ध गीतकार वैरामुथू आणि त्यांचा मुलगा मदन करकी यांनीही सौंदर्या आणि विशनगन वनानगामुडीच्या लग्नाला आवर्जुन उपस्थिती लावली होती. (छाया सौजन्य- स्पेशल अरेंजमेन्ट)


राघव लॉरेन्सही सौंदर्या आणि विशनगन वनानगामुडीच्या लग्नाला शुभेच्छा द्यायला आले होते. (छाया सौजन्य- स्पेशल अरेंजमेन्ट)


नक्केरन गोपल यांनीही सौंदर्या आणि विशनगन वनानगामुडीच्या लग्नाला हजेरी लावली होती. (छाया सौजन्य- स्पेशल अरेंजमेन्ट)


तेलुगू स्टार मोहन बाबू सहकुटुंब नववधूला आशीर्वाद द्यायला आले होते. (छाया सौजन्य- स्पेशल अरेंजमेन्ट)


फिल्ममेकर केएस रवीकुमार सहकुटुंब वधू- वरांसोबत फोटो काढताना. (छाया सौजन्य- स्पेशल अरेंजमेन्ट)


याआधी ८ फेब्रुवारीला एक ग्रँड रिसेप्शन ठेवण्यात आलं होतं. तसेच १० फेब्रुवारीला मेहंदीचा कार्यक्रमही होता. या सर्व विधींवेळी फक्त जवळचे मित्र- मैत्रिणी आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित होते. रिसेप्शनचे फोटोही सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.


लग्नाच्या सर्व विधी नववधू आणि वर एन्जॉय करताना दिसत आहेत. कार्यक्रमातून वेळ काढत वधू-वर सेल्फी घ्यायला विसरले नाहीत..


सौंदर्याचं हे दुसरं लग्न आहे. तिचं पहिलं लग्न व्यावसायिक अश्वीन रामकुमार याच्याशी झाले होते. अश्वीन आणि सौंदर्याने लग्नाच्या ७ वर्षांनंतर घटस्फोट घ्यायचा निर्णय घेतला. सौंदर्याला एक मुलगाही आहे, त्याचं नाव वेदकृष्ण.