‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’फेम रोहित आणि जुईलीच्या लग्नाचे UNSEEN फोटो
काही दिवसांपासून रोहित आणि जुईली (Rohit Raut And Juilee jogalekar Wedding )यांच्या घरी लग्नाची लगबग सुरु होती. काल 23 जानेवारी 2022 रोजी या दोघांचा लग्न सोहळा अगदी थाटामाटात पार पडला.
|
1/ 9
मराठी कलाविश्वात सध्या लग्नसराईची धामधूम सुरु असल्याचं दिसून येत आहे. अशातच आता आणखी एका जोडप्याचा लग्नसोहळा नुकताच पार पडला आहे.
2/ 9
काही दिवसांपासून ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’फेम रोहित आणि जुईली यांच्या घरी लग्नाची लगबग सुरु होती. काल 23 जानेवारी 2022 रोजी या दोघांचा लग्न सोहळा अगदी थाटामाटात पार पडला.
3/ 9
लग्नातील गोड क्षणाचे काही सुंदर फोटो (Rohit Raut And Juilee jogalekar Wedding Photos ) जुईलीने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर शेअर केले आहेत. चाहत्यांकडून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.
4/ 9
रोहित आणि जुईलीने पारंपारिक पद्धतीने पुण्यातील ढेपे वाड्यात लग्नगाठ बांधली आहे. दोघांनीही पारंपारिक कपडे परिधान केले आहेत.
5/ 9
जुईलीने जांभळ्या रंगाची नऊवारी घातली आहे व त्याच्यासोबत पारंपारिक दागिने घातले आहेत. तर रोहितने देखील तिच्या नऊवारीला मॅच होणार कुर्ता आणि धोतर परिधान केले आहे. आयुष्यभरासाठी ही जीडी बंधनात अडकली आहे.
6/ 9
रोहित आणि जुईली हे एकमेकांना अनेक वर्षांपासून डेट करत होते. रोहित राऊत आणि जुईली जोगळेकरची पहिली भेट ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’ च्या मंचावर झाली होती. अनेकदा सोशल मीडियावर एकमेकांसोबतचे फोटो शेअर करुन त्यांनी प्रेमाची जाहीर कबुलीदेखील दिली होती.
7/ 9
जुईली नव्या पिढीची गायिका आहे.जुईलीचे सोशल मीडियावर देखील खूप चाहते आहेत. शिवाय तिचं युट्यूब चॅनेल देखील आहे. रोहितचा देखील सोशल मीडियावर प्रचंड चाहता वर्ग आहे. विशेषकरून त्याची तरूणींमध्ये मोठी क्रेझ पाहायला मिळते.
8/ 9
रोहित आणि जुईलीच्या लग्नसोहळ्याला ‘सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’फेम तारकांनीदेखील हजेरी लावली होती.
9/ 9
सा रे ग म प लिटिल चॅम्प्स’फेम कार्तिकी गायकवाडने आपल्या पतीसह उपस्थिती लाली होती.