अभिनेता रितेश देशमुखने (Riteish Deshmukh) नुकतच नवं फोटोशुट केलं आहे. ज्यानंतर त्याचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. चाहत्यांनी रितेशच्या लुकची तुलना रणवीर सिंगशी केली आहे. कोणी म्हटलं रणवीर सिंगला भेटला होतास का? तर कोणी म्हटलं रणवीरचं दुसरं वर्जन फोटोत तो हटके जॅकेट आणि पॅन्ट अशा अवतारात दिसत आहे. विनोदी अभिनेता अशी रितेशची ओळख आहे. त्यामुळे त्याचे नेहमीच हटके लुक्स पाहायला मिळतात. एक विलन मध्ये तो विलन देखील बनला होता. रितेश सोशल मीडियावर फार सक्रिय असतो. याशिवाय नेहमी नवनवीन लुक्स तो शअर करत असतो. रितेशला कम्प्लिट फॅमिली मॅन म्हटलं जातं. तो नेहमी पत्नी जिनीलिया आणि मुलांसोबत फोटो आणि व्हिडीओस शेअर करत असतो.