अभिनेता रितेश आणि जिनिलिया देशमुख आज त्यांच्या नात्याची 20 वर्ष आणि लग्नाची 10 वर्ष साजरी करत आहेत.
3 फेब्रुवारी 2012 साली दोघांनी लग्न केलं. देशमुखांच्या घरात जिनिलियाचं मोठ्या दणक्यात स्वागत करण्यात आलं होतं.
लग्नानंतर जिनिलिया पूर्णपणे महाराष्ट्रीय संस्कृतीमध्ये आली होती. तेव्हा लग्नाच्या काही दिवसांत जिनिलियाचा देशमुखांच्या घरात चांगलाच गोंधळ उडाला होता. लग्नाच्या तब्बल 10 वर्षांनी रितेशनंच याचा खुलासा केलाय.
दोघांचा वेड हा पहिला मराठी सिनेमा रिलीज झालाय. या सिनेमाच्या प्रमोशन दरम्यान एका मुलाखतीत रितेशनं 10 वर्षांपूर्वीची एक गंमत सांगितली.