

बॉलिवूड अभिनेता ऋषी कपूर आपल्या कुटुंबाच्या फार जवळ आहेत. सध्या ते न्यूयॉर्कमध्ये आपल्या आजारावर उपचार घेत आहेत.


त्यांची दोन्ही मुलं रणबीर आणि रिधिमा त्यांन अनेकदा भेटायला न्यूयॉर्कमध्ये जातात. त्यांच्यासोबतचे फोटो ते सोशल मीडियावरही शेअर करतात. नुकताच ऋषी यांचा नातीसोबतचा फोटो शेअर करण्यात आला आहे.


फोटोमध्ये नात समारासोबत ऋषी दिसत आहेत. दोघांच्या चेहऱ्यावर हसू आहे. हा फोटो समाराच्या वाढदिवसाचा दिसत आहे.


रिधिमा कपूरने तिच्या इन्स्टाग्राम स्टोरीमध्ये शेअर केला. रिधिमाने हार्टवालं इमोजी ही यात टाकलं. समारासोबतचा ऋषी यांचा हा जुना फोटो सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.


गेल्या काही महिन्यांपासून ऋषी अमेरिकेत त्यांच्या आजारावर उपचार घेत आहेत. पण त्यांना नेमका कोणता आजार झाला याचा खुलासा करण्यात आलेला नाही. मार्च महिन्यात ऋषी भारतात परततील असं म्हटलं जात होतं. मात्र असं काही झालं नाही.