आज संपूर्ण देश प्रजसत्ताक दिन साजरा करण्यात मग्न आहे. यानिमित्ताने अभिनेत्री रिंकू राजगुरूने सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. रिंकू राजगुरूने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये रिंकूने पांढराशुभ्र चुडीदार परिधान केला आहे. तर त्यावर रंगीबेरंगी ओढणी घेतली आहे. अभिनेत्री या ट्रॅडिशनल पोशाखात फारच सुंदर दिसत आहे. रिंकूने फोटो शेअर करत सर्वांना शुभेच्छा दिल्या आहेत. अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्रामवर पोस्ट शेअर करत देशासाठी आपल्या प्राणांची आहुती दिलेल्या जवानांना वंदन केलं आहे. कोणताही खास दिवस असो रिंकू राजगुरू आपल्या चाहत्यांना आवर्जून शुभेच्छा देते. रिंकू राजगुरू सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करत असते. रिंकू राजगुरूने शेअर केलेल्या या सुंदर फोटोंवर कमेंट्स करत चाहतेही प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देत आहेत.