

सैराट फेम रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) तिच्या नव्या प्रोजेक्टसाठी सज्ज झाली आहे. लवकरच ती आपल्याला ‘अनपॉज्ड’या अॅमेझॉन प्राईमच्या एका चित्रपटात दिसणार आहे.


अनपॉज्डमध्ये 5 शॉर्टफिल्म दाखवण्यात आल्या आहेत. त्यातल्या एका शॉर्टफिल्ममध्ये रिंकू राजगुरूही झळकणार आहे.


विशेष म्हणजे या शॉर्ट फिल्मचं दिग्दर्शन राज अँड डीके, निखील अडवाणी, तनिष्ठा चॅटर्जी, अविनाश अरूण आणि नित्या मेहरा अशा 5 दिग्दर्शकांनी केलं आहे.


रिंकू राजगुरूची भूमिका यामध्ये अतिशय वेगळी असेल. नुकताच या शॉर्टफिल्मचा टीझर रिलीज करण्यात आला.


काही दिवसांपूर्वी रिंकूची हंड्रेड ही वेब सीरिज प्रदर्शित झाली होती. पण त्याला प्रेक्षकांची फारशी पसंती मिळाली नव्हती.


अनपॉज्ड चित्रपटाचा टिझर 8 डिसेंबरला रीलिज करण्यात येणार आहे. तर 18 डिसेंबर रोजी अॅमेझॉन प्राईम या ओटीटी प्लॅटफॉर्मवर हा चित्रपट प्रदर्शित करण्यात येईल.


रिंकूच्या चाहत्यांना तिच्या नव्या प्रोजेक्टची उत्सुकता लागून राहिली आहे. या आधी रिंकू राजगुरूने सैराट सोबतच कागर हा सिनेमाही केला होता.


सैराटपासून रिंकूच्या सिनेक्षेत्रातील कामाला सुरूवात झाली. या चित्रपटामध्ये तिला प्रचंड यश मिळालं होतं.