मराठमोळी अभिनेत्री रिंकू राजगुरू आपल्या प्रत्येक लुकमध्ये फारच उठून दिसते. वेस्टर्न असो किंवा ट्रॅडिशनल प्रत्येक लुकमध्ये रिंकू सुंदर दिसते. अभिनेत्री रिंकू राजगुरूने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले सुंदर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये रिंकूचा ट्रॅडिशनल लुक दिसून येत आहे. रिंकूने शेअर केलेल्या फोटोंमध्ये ती गुलाबी रंगाच्या साडीमध्ये दिसून येत आहे. गुलाबी रंग रिंकूवर फारच खुलून दिसत आहे. रिंकूने गुलाबी साडीसोबत निळ्या रंगाचा ब्लाउज असं क्लासी कॉम्बिनेशन केलं आहे. अभिनेत्रीने सौम्य मेकअप आणि स्ट्रेट हेयरने आपला लुक कंप्लिट केला आहे. रिंकू राजगुरूने इन्स्टाग्रामवर आपले सुंदर फोटो शेअर करत त्याला कॅप्शन दिलं आहे, 'एक गुलाबी दिवस'. रिंकू सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत आपले फोटो आणि व्हिडीओ शेअर करून चाहत्यांच्या संपर्कात असते. चाहते तिच्या प्रत्येक पोस्टला भरभरून प्रेम देत असतात. चित्रपटांसोबतच ती सोशल मीडियावरसुद्धा फारच लोकप्रिय आहे. रिंकू राजगुरूने आपलं वजन मोठ्या प्रमाणात कमी केलं आहे. तिचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून सर्वच थक्क होतात.