‘कुटुंबीयांसाठी मी पैसे कमवण्याचं मशीन होते’; रिमी सेनचा खळबळजनक खुलासा
रिमी सेननं का सोडलं बॉलिवूड?; सांगितलं खरं कारण...
|
1/ 10
रिमी सेन ही बॉलिवूडमधील एक नामांकित अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Rimi Sen/Instagram)
2/ 10
धुम, हंगामा, फिर हेरा फेरी, गोलमाल, दिवाने हुए पागल यांसारख्या अनेक सुपरहिट चित्रपटातून तिनं जवळपास एक दशक प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. (Rimi Sen/Instagram)
3/ 10
2000च्या दशकात बॉलिवूडमधील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींच्या यादीत झळकणारी रिमी गेल्या काही काळात सिनेसृष्टीतून दूर आहे. (Rimi Sen/Instagram)
4/ 10
मात्र नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीमुळं ती पुन्हा एकदा प्रकाशझोतात आली आहे. (Rimi Sen/Instagram)
5/ 10
रिमीनं टाईम्स नाऊला दिलेल्या मुलाखतीत आपल्या करिअरवर भाष्य केलं. त्यावेळी तिनं काही चकित करणारे अनुभव देखील सांगितले. तिचे कुटुंबीय केवळ पैसे कमवण्याचं मशीन म्हणून तिच्याकडे पाहायचे असा अनुभव तिनं सांगितला. (Rimi Sen/Instagram)
6/ 10
रिमीचा जन्म एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला होता. मात्र तरी देखील लहानपणीच तिच्यावर घराची आर्थिक जबाबदारी टाकण्यात आली होती. (Rimi Sen/Instagram)
7/ 10
कुटुंबीय आर्थिक संकटात असल्यामुळं तिनं मिळेल ते काम करण्यास होकार दिला. तिनं कधीही तिची व्यक्तीरेखा काय आहे. चित्रपटाच्या पटकथेत तिला किती महत्व आहे याचा विचार तिनं कधीही केला नाही. (Rimi Sen/Instagram)
8/ 10
केवळ पैसे किती मिळतील? हा एकमेव प्रश्न ती निर्मात्यांना विचारायची. त्यामुळं तिला अपेक्षित असलेले रोल कधीही मिळाले नाहीत. (Rimi Sen/Instagram)
9/ 10
खरं तर तिला निर्माता किंवा दिग्दर्शक म्हणून काम करण्याची इच्छा होती. परंतु या क्षेत्रात मोठी आर्थिक रिस्क असते. अन् कुठल्याही प्रकारचा आर्थिक धोका स्विकारण्याची परवानगी तिला कुटुंबीयांनी दिली नव्हती त्यामुळं तिनं अभिनेत्री म्हणूनच काम केलं. (Rimi Sen/Instagram)
10/ 10
बॉलिवूडमध्ये ती ज्या प्रकारचं काम करत होती त्यामधून तिला मानसिक समाधान मिळत नव्हतं त्यामुळं अखेर तिनं काम करणं थांबवलं येत्या काळात ती निर्माता म्हणून बॉलिवूडमध्ये पुनरागमन करणार असंही म्हणाली. (Rimi Sen/Instagram)