‘असुर’ या वेब सीरिजमधून प्रकाशझोतात आलेली रिद्धी डोगरा ही छोट्या पडद्यावरील एक प्रसिद्ध अभिनेत्री म्हणून ओळखली जाते. (Ridhi Dogra/Instagram)
2/ 10
ग्लॅमरस फोटो आणि व्हिडीओंमुळं रिद्धी अभिनयासोबतच सोशल मीडियावर देखील प्रचंड चर्चेत असते. (Ridhi Dogra/Instagram)
3/ 10
मात्र यावेळी ती कुठल्याही पोस्टमुळं नव्हे तर चक्क राजकीय पार्श्वभूमीमुळं चर्चेत आहे. (Ridhi Dogra/Instagram)
4/ 10
रिद्धी ही दिवंगत माजी केंद्रीय अर्थमंत्री आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांची भाची आहे. (Ridhi Dogra/Instagram)
5/ 10
अरुण जेठली यांच्या पत्नी संगीता जेठली या रिद्धीच्या आत्ता आहेत. (Ridhi Dogra/Instagram)
6/ 10
त्यामुळं रिद्धी अरुण जेटली यांच्या अनेक कौटुंबिक कार्यक्रमात त्यांच्या सोबत दिसायची. तिचे फोटो देखील व्हायरल व्हायचे. (Ridhi Dogra/Instagram)
7/ 10
रिद्धीचं आणि जेटली कुटुंबाचं हे नातं खूपच कमी लोकांना माहिती आहे. अन् तिनं देखील कधीही याबाबत जाहिरातबाजी केली नाही. (Ridhi Dogra/Instagram)
8/ 10
रिद्धीनं कधीही आपल्या राजकीय ओळखीचा वापर करुन चित्रपटांमध्ये काम मिळवण्याचा प्रयत्न केला नाही. (Ridhi Dogra/Instagram)
9/ 10
तिनं इतर सर्वसामान्य विद्यार्थ्यांप्रमाणेच विविध ऑडिशन्स देऊन मालिकांमध्ये काम मिळवलं. कारण तिला स्वत:ची ओळख प्रस्थापित करायची होती. (Ridhi Dogra/Instagram)
10/ 10
तिनं आतापर्यंत ‘झुमे जिया रे’, ‘हिंदी है हम’, ‘लगी तुझसे लगन’, ‘मर्यादा’ यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केलं. येत्या काळात ती अल्ट बालाजीवरील ‘द मॅरेड वुमन’ या मालिकेत झळकणार आहे. (Ridhi Dogra/Instagram)