अनिल कपूरच्या घरी लगीनघाई! रियाच्या लग्नासाठी पाहुण्यांची मांदियाळी
अभिनेते अनिल कपूर यांच्या दुसऱ्या मुलीच्या म्हणजेच रिया कपूरच्या विवाहासाठी पाहूण्यांचं आगमन झालं आहे.
|
1/ 11
अभिनेते अनिल कपूर यांची दुसरी मुलगी रिया कपूर आज विवाहबंधनात अडकत आहे. तिच्या विवाहासाठी आता अनेक पाहूण्यांची रेलचेल सुरू झाली आहे.
2/ 11
रिया कपूर ही करण बूलानी या तिच्या दीर्घकाळ राहिलेल्या बॉयफ्रेंडशी लग्न करत आहे. रिया अभिनयात नाही तर चित्रपट निर्मिती आणि फॅशन ब्रँडसाठी काम करते. करण देखील चित्रपट निर्माता आहे.
3/ 11
रियाच्या बहिणी खूशी आणि शनाया देखील पोहोचल्या आहेत.
4/ 11
सुंदर ड्रेस परिधान करत त्या बहिणीच्या लग्नासाठी पोहोचल्या आहेत.
5/ 11
संजय कपूर यांची पत्नी माहिप कपूरही लग्नासाठी पोहोचल्या आहेत.
6/ 11
भाऊ अभिनेता अर्जून कपूर (Arjun Kapoor) देखील पोहोचला आहे.
7/ 11
संजय कपूर पत्नी आणि मुलासह दिसत आहे.
8/ 11
अर्जूनची बहीण अंशूला देखील बहीण रियाच्या लग्नासाठी पोहोचली आहे.
9/ 11
बोनी कपूर देखील लग्नासाठी हजर आहेत.
10/ 11
मुंबईतील जुहू येथील अनिल कपूर यांच्या बंगल्यातच हा विवाह होणार आहे.
11/ 11
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कमी पाहूण्यांच्या उपस्थितीत हा विवाह होणार आहे.