बॉलिवूड अभिनेत्री रिया चक्रवर्तीने नुकतंच आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले आणि सुशांतचे काही अनसीन फोटो शेअर केले आहेत.
2/ 7
अभिनेत्रीने फोटो शेअर करत 'मला प्रत्येक दिवशी तुझी आठवण येते' असं कॅप्शन दिलं आहे.
3/ 7
सुशांत सिंह राजपूत आणि रिया चक्रवर्ती रिलेशनशिपमध्ये होते असं म्हटलं जातं.
4/ 7
आज अभिनेता सुशांत राजपूतच्या निधनाला तब्बल दोन वर्षे झाली आहेत. आजच्या दिवशी म्हणजेच १४ जून २०२० रोजी सुशांत त्याच्या राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला होता.
5/ 7
या घटनेने संपूर्ण देश हादरला होता. सुरुवातीला ही आत्महत्या असल्याचं म्हटलं गेलं होतं. मात्र त्यांनतर या प्रकरणाची सीबीआई चौकशी करण्याची मागणी करण्यात आली होती.
6/ 7
या प्रकरणात सुशांतची गर्लफ्रेंड आणि अभिनेत्री रिया चक्रवर्तीलासुद्धा अटक करण्यात आली होती.
7/ 7
यांनतर समोर आलेल्या ड्रग्स प्रकरणात रियाला तुरुंगवास झाला होता. सध्या ती जामिनावर बाहेर आहे. मात्र आजही सुशांतचे चाहते तिला प्रचंड ट्रोल करतात.