'कुणी पोलीस, तर कुणी सैन्यात' चित्रपटात येण्यापूर्वी या कलाकारांनी केली आहे देशसेवा
आज देशात प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आपण असे काही कलाकार पाहणार आहोत ज्यांना चित्रपटात येण्यापूर्वी देशसेवा केली आहे.
|
1/ 8
आज देशात प्रजासत्ताक दिवस मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. यानिमित्ताने आपण असे काही कलाकार पाहणार आहोत ज्यांना चित्रपटात येण्यापूर्वी देशसेवा केली आहे.
2/ 8
मोहनलाल- साऊथ चित्रपटसृष्टीत मोहनलाल यांचं प्रचंड मोठं नाव आहे. त्यांनी अनेक चित्रपटांतून प्रेक्षकांचं मन जिंकलं आहे. परंतु फारच कमी लोकांना माहिती आहे, की ते टेटोरिअल सैन्यात लेफ्टनंट कर्नल पदावर कार्यरत आहेत.
3/ 8
मेजर रुद्राशीष माजुमदार- सुशांत सिंह राजपूतच्या 'छिछोरे' चित्रपटात काम करणारे रुद्राशीष 7 वर्षे भारतीय सैन्यात होते. त्यांनतर त्यांनी रिटायरमेंट घेतली होती.
4/ 8
गुफी पेन्टल- महाभारत सारख्या लोकप्रिय मालिकेत काम करणारे अभिनेते गुफी पेन्टल भारतीय सैन्यात कॅप्टन होते.
5/ 8
अभिनेते रेहमान- 'चौदवी का चाँद', हिरा पन्ना अशा गाजलेल्या चित्रपटात काम केलेले अभिनेते म्हणजे रेहमान होय. त्यांनी चाळीसच्या दशकात मोठी लोकप्रियता मिळवली होती. परंतु याआधी ते इंडियन एयरफोर्समध्ये कार्यरत होते.
6/ 8
बिक्रमजीत कंवरपाल- अनेक चित्रपटात विविध भूमिका साकारणारे दिवंगत अभिनेते बिक्रमजीत कंवरपाल चित्रपटात येण्यापूर्वी भारतीय सैन्यातील रिटायर्ड मेजर होते.
7/ 8
अभिनेते राजकुमार- राजकुमार यांच्या भारदस्त आवाजाने सर्वानांच भुरळ घातली होते. त्यांच्या कडक स्वभावाची प्रचिती अनेकांना आहे. हे अभिनेते चित्रपटात येण्यापूर्वी एक पोलीस अधिकारी होते.
8/ 8
आनंद बख्शी- अनेक चित्रपटांसाठी सदाबहार गाणी लिहिणारे गीतकार आनंद बख्शी भारतीय नौदलात कार्यरत होते.