बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन सध्या आपल्या 'KGF 2' या बहुप्रतीक्षित चित्रपटामुळे चांगलीच चर्चेत आहे. या चित्रपटाचं जोरदार प्रमोशन सुरु आहे. 'KGF 2' या बहुचर्चित साऊथ चित्रपटामध्ये रवीना टंडनने मुख्यमंत्री रमिका सेनची महत्वपूर्ण भूमिका साकारली आहे. दरम्यान अभिनेत्रीने आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपले काही फोटो शेअर करत सर्वांचंच लक्ष वेधलं आहे. रवीनाने सिल्व्हर कलरच्या जम्पसूटमध्ये आपले काही फोटो शेअर केले आहेत. यामध्ये ती फारच ग्लॅमरस दिसत आहे. वयाच्या पन्नाशीतसुद्धा ही अभिनेत्री तितकीच तरुण आणि सुंदर दिसत आहे. तिच्या दिसण्यावरून तिच्या वयाचा अंदाज लावणं कठीण झालं आहे. रवीनाने आजही आपलं फिटनेस अगदी उत्तम ठेवलं आहे. चाहते फोटोंवर भरभरून लाईक्स आणि कमेंट्स देत अभिनेत्रीचं कौतुक करत आहेत. रवीना टंडन सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असते. ती सतत काही ना काही पोस्ट शेअर करत असते. रवीना सध्या 'KGF 2' च्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. ती सतत टीमसोबत विविध ठिकाणी दिसून येत आहे.